on Thursday, August 1, 2013









संगणकाला आपले कार्य पूर्ण करण्याकरिता खालीलप्रमाणे तीन टप्प्यांतून जावे लागते.
  • इनपुट डिव्हाइस (Input device)                                
  • प्रक्रिया (Process)                                            
  • आउटपुट डिव्हाइसेस (Output Device)
इनपुट डिव्हाइस (Input device)
संगणक हे मानव निर्मित इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. मानवाने संगणकाला पुरविलेल्या माहिती किंवा सूचनांवर प्रक्रिया करून ते उत्तरे प्रदर्शित करते.संगणकाला सूचना देण्याकरिता वापरता येणाऱ्या साधनांना इनपुट डिव्हाइस असे म्हणतात. उदा. माउस, की बोर्ड व जॉयस्टिक इत्यादी.
प्रक्रिया (Process)
सी. पी. यू चे आंतरिक कार्य म्हणजे इनपुट डिव्हाइस द्वारे – की बोर्ड व माउसच्या साहाय्याने – पुरविलेली माहिती ही मेमरी युनिटमध्ये (MU) साठवली जाते. या माहितीचे शब्द (Text) व गणिती प्रक्रिया,  अर्तमटीकल (Arithmatical) किंवा लोंजिकल(Logical) असे वर्गीकरण होते. ही माहिती शब्दांत असे तर मेमरी युनिट स्वत: प्रक्रिया करते, अन्यथा ती Arithmatical /Logical प्रकारची असे तर ALU कडे पाठविली जाते. ALU मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्याचे उत्तर मेमरी युनिटकडे परत पाठविते. MU मध्ये त्याचा परिणाम साठवून तो आउटपुट डिव्हाइसेस कडे पाठविला जातो. म्हणजेच, प्रदर्शित उत्तर आपल्याला मॉनिटर किंवा प्रिंटरद्वारे मिळते. या सर्व प्रक्रियेवर कंट्रोल युनिट नियंत्रण करतो.     
आउटपुट डिव्हाइसेस (Output Device)
सी. पी. यू. प्रक्रिया करून जे उत्तर प्रदर्शीत करतो. त्याकरिता उपयोगात येणाऱ्या साधनांना आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात. उदा. मॉनिटर व प्रिंटर इत्यादी