संगणकाची कार्यप्रणाली

#









संगणकाला आपले कार्य पूर्ण करण्याकरिता खालीलप्रमाणे तीन टप्प्यांतून जावे लागते.
  • इनपुट डिव्हाइस (Input device)                                
  • प्रक्रिया (Process)                                            
  • आउटपुट डिव्हाइसेस (Output Device)
इनपुट डिव्हाइस (Input device)
संगणक हे मानव निर्मित इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. मानवाने संगणकाला पुरविलेल्या माहिती किंवा सूचनांवर प्रक्रिया करून ते उत्तरे प्रदर्शित करते.संगणकाला सूचना देण्याकरिता वापरता येणाऱ्या साधनांना इनपुट डिव्हाइस असे म्हणतात. उदा. माउस, की बोर्ड व जॉयस्टिक इत्यादी.
प्रक्रिया (Process)
सी. पी. यू चे आंतरिक कार्य म्हणजे इनपुट डिव्हाइस द्वारे – की बोर्ड व माउसच्या साहाय्याने – पुरविलेली माहिती ही मेमरी युनिटमध्ये (MU) साठवली जाते. या माहितीचे शब्द (Text) व गणिती प्रक्रिया,  अर्तमटीकल (Arithmatical) किंवा लोंजिकल(Logical) असे वर्गीकरण होते. ही माहिती शब्दांत असे तर मेमरी युनिट स्वत: प्रक्रिया करते, अन्यथा ती Arithmatical /Logical प्रकारची असे तर ALU कडे पाठविली जाते. ALU मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्याचे उत्तर मेमरी युनिटकडे परत पाठविते. MU मध्ये त्याचा परिणाम साठवून तो आउटपुट डिव्हाइसेस कडे पाठविला जातो. म्हणजेच, प्रदर्शित उत्तर आपल्याला मॉनिटर किंवा प्रिंटरद्वारे मिळते. या सर्व प्रक्रियेवर कंट्रोल युनिट नियंत्रण करतो.     
आउटपुट डिव्हाइसेस (Output Device)
सी. पी. यू. प्रक्रिया करून जे उत्तर प्रदर्शीत करतो. त्याकरिता उपयोगात येणाऱ्या साधनांना आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात. उदा. मॉनिटर व प्रिंटर इत्यादी

संगणकाचे इनपुट डिव्हाइस

#

कि-बोर्ड 
KeyBoard


कि-बोर्ड हा संख्यांचा, अद्याक्षारचा तसेच सांकेतिक चिन्हांच्या ‘कि’ पासून तयार झालेला असतो. कि-बोर्ड एक आऊटपुट डीव्हाईस असून संगणकाला सूचना देण्याचा त्याचा उपयोग केला जातो. कि-बोर्डमध्ये सर्वसाधारणपणे १०१-१०४ बटणांचा समावेश असतो तर मल्टीमिडिया कीबोर्डमध्ये बटणांची संख्या १०४-१२८ पर्यंत असू शकते.
कि बोर्डवरील ‘कि’चा संच 
  • अल्फाबेट किज :-   A ते Z
  • न्युमेरीकल कीज :-  0 ते 9
  • स्केप कि (ESC) :- कोणत्याही प्रोग्राम किंवा अप्लीकेशनमधून बाहेर येण्यासाठी  
  • फंकशन कीज   :-    F1 ते F12.
  • कॅप्स लॉक :-     सर्व अक्षरे मोठ्या लिपीत (CAPITAL) लिहिण्यासाठी.
  • शिफ्ट कि  :-  एखादे अक्षर मोठ्या लिपीत (CAPITAL) लिहिण्यासाठी आन चिन्हांचा वापर करण्यासाठी.
  • बॅक स्पेस :- अक्षरे खोडण्यासाठी वापरतात. (कर्सरच्या डावीकडील अक्षरे खोडण्यासाठी वापरतात)
  • डीलीट :-  या कि ने (CURSOR )कर्सरच्या उजवीकडील अक्षरे खोडली जातात.
  • स्पेसबर  :-  दोन शब्द किंवा अक्षरमधे अंतर राखण्याकरिता.

माऊस


माऊस हा संगणकाचा इनपुट डिव्हाइस आहे. संगणकाला सूचना देण्याकरिता माऊसचा वापर केला जातो.     माऊसला कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त तीन बटणे असतात. माऊसचे डावे बटण दाबल्याने माऊसचा पॉइंटर ज्या ठिकाणी असतो तो भाग पुढील कामासाठी निदर्शित केला जातो. पण हेच जर दोनदा क्लिक केले तर आपण ज्या अॅप्लिकेशन वर क्लिक केले ते अॅप्लिकेशन कार्यरत होते. माऊसच्या डाव्या बाजूचे बटण दाबल्याने मेनू कार्य निदर्शित होते. माऊसचे उजवे बटण दाबल्याने कोंटेक्स्ट मेनू निदर्शित होतो.

 माऊसचे प्रकार
1. मेकॅनिकल माऊस 


या प्रकारातील माऊसच्या खालच्या बाजूस असणारा बॉल हा मेटल किंवा रबर यापासून बनविलेला असतो. त्यामुळे कोणत्याही दिशेला सुलभरीत्या हालचाल करू शकतो. माऊसच्या अंतर्गंत असणारा सेन्सर हा मेकॅनिकल असल्यामुळे तो बॉलची दिशा निश्चित करीत असतो. त्याप्रमाणे स्क्रीनवरील माऊस पॉइंटर हालचाल करतो. या माऊस करिता माऊस पॅडची गरज भासते. या माऊसला धुळीचा उपद्रव त्वरित होतो.



 2. ऑटो मेकॅनिकल माऊस
हा माऊस सुद्धा मेकॅनिकल माऊस सारखा असतो. परंतु या माऊस मध्ये मेकॅनिकल सेन्सर ऐवजी ऑप्टिकल सेन्सरचा वापर करण्यात आलेला आहे. तो माऊसच्या बॉलची दिशा निर्धारित करतो. या माऊसलासुद्धा माऊस पॅडची गरज भासते. 


  3. ऑप्टिकल माऊस

ह्या माऊसच्या प्रकारामध्ये लेजर किरनांचा वापर माऊस पॉइंटरची दिशा निश्चित करण्याकरिता उपायोगात आणला जातो. या माऊस पॅडची गरज भासत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारची यंत्रसामुग्री नसते. हा माऊस जलद व सुलभ रीतीने कार्य करतो.












संगणकाचे आऊटपुट डिव्हाइस

#

मॉनिटर
मॉनिटर हा संगणकाचा आऊटपुट डिव्हाइस आहे. की बोर्ड व माउस द्वारे दिलेल्या आज्ञाचे किंवा पुरविलेल्या महितीवरील प्रश्नाचे उत्तर हे मॉनिटरच्या स्क्रीनवर वाचता किंवा पाहता येते. मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले यूनिट असेही म्हटले जाते. सीआरटी मॉनिटरचा शोध एक जर्मन वैज्ञानिक ‘फर्ड्रिनंड ब्राऊन’ यांनी १८९७ मध्ये लावला. प्रदर्शित माहिती ही चित्रे, अक्षरे, व अंकांच्या स्वरुपात पटलावर दिसते. ही माहीती लहान आकाराच्या ठिपक्यामध्ये असते. त्यांना पीक्सेल असे म्हणतात. मॉनिटर कथोंड रे (सीआरटी) साहाय्याने बनविलेला असतो. सर्वसाधारण मॉनिटर स्क्रीनचा आकार ८ इंच ते सतरा इंचात उपलब्ध असतो. अलीकडे एलसीडी (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले) किंवा टीएफटी (थिन फिल्म ट्रान्सीटर) मॉनिटरचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. सीटीआर चे तंत्रज्ञान न वापरता एलसीडी (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले) चा वापर केलेला असतो. 
 LCD मॉनिटर   

CRT मॉनिटर


प्रिंटर
प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकातील तयार उत्तर हे कागदावर मुद्रित करण्याकरिता या साधनाचा वापर करतात. प्रिंटर द्वारे होत असलेला मजकूर हा कायमस्वरूपी असतो. त्यामध्ये बदल करता येत नाही. यामुळेच त्याला हार्ड कॉपी असे म्हणतात.

प्रिंटरचे विविध प्रकार आहेत
  • इंकजेट प्रिंटर
  • डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
  • लेजर प्रिंटर इत्यादी.

इंकजेट प्रिंटर 

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर

लेजर प्रिंटर 

संगणकाची चौथी जनरेशन

#
संगणकाच्या विकसनातील चौथी जनरेशन (१९७१ पासून आजपर्यंत)


  • इंटिग्रेटेड सर्किटस्नंतर विकासाची पुढची एकाच दिशा शक्य होती. ती म्हणजे चीपचा आकार! म्हणजेच लार्ज स्केल इंटिग्रेशन (LSI) अर्थात एकाच चिपवर शेकडो घटक बसविणे.
  • १९८० च्या दशकात व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (VLSI) मुळे लक्षावधी घटक एकाच चिपवर बसविणे शक्य झाले.
  • अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन (ULSI) मुळे हीच संख्या काही दशलक्षांपर्यंत वाढली.
  • १९७१ मध्ये विकसित केल्या गेलेल्या Intel 4004 (इंटेल ४००४) मुळे इंटिग्रेटेड सर्किटसने आणखी एक पुढचा मोठा टप्पा गाठला. तो म्हणणे संगणकाचे सर्व घटक (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी आणि इनपुट-आउटपुट नियंत्रक) अत्यंत छोट्या सेमिकंडक्टर चिपवर बसवले होते. 
  • पूर्वी प्रत्येक कामाच्या गरजेनुसार इंटिग्रेटेड सर्किटचे वेगवेगळे उत्पादन करावे लागे. आता मात्र एकाच प्रकारच्या मायक्रोप्रोसेसरचे उत्पादन करून त्याच्यापासून कितीही वेगवेगळया उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रोग्रॅम करणे शक्य झाले आहे.
  • लवकरच मायक्रोवेव्ह ओव्हन्स, दूरचित्रवाणी संच, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टिम असलेली वाहने यांसारख्या वस्तूंमध्ये मायक्रोप्रोसेसर्सचा वापर सुरु झाला. 
IBM Personal Computer
  • १९८१ मध्ये IBM ने त्यांचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर (सुटसुटीत छोटा संगणक) घर, ऑफिस आणि शाळांमध्ये वापरण्यासाठी बाजारात आणला. 
  • लॅन LAN (लोकल एरिया नेटवर्क) सारखे थेट वायरिंग अथवा दूरध्वनीच्या तारांच्या माध्यमातील ही नेटवर्क्स (जाळी) प्रचंड प्रमाणात पसरू लागली. संगणकाच्या जागतिक महाजालाच्या, उदाहरणार्थ इंटरनेटच्या माध्यमातून माहितीच्या एकाच जाळयात जगभरातील संगणक जोडले गेले.