on Thursday, July 18, 2013

मॉनिटर
मॉनिटर हा संगणकाचा आऊटपुट डिव्हाइस आहे. की बोर्ड व माउस द्वारे दिलेल्या आज्ञाचे किंवा पुरविलेल्या महितीवरील प्रश्नाचे उत्तर हे मॉनिटरच्या स्क्रीनवर वाचता किंवा पाहता येते. मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले यूनिट असेही म्हटले जाते. सीआरटी मॉनिटरचा शोध एक जर्मन वैज्ञानिक ‘फर्ड्रिनंड ब्राऊन’ यांनी १८९७ मध्ये लावला. प्रदर्शित माहिती ही चित्रे, अक्षरे, व अंकांच्या स्वरुपात पटलावर दिसते. ही माहीती लहान आकाराच्या ठिपक्यामध्ये असते. त्यांना पीक्सेल असे म्हणतात. मॉनिटर कथोंड रे (सीआरटी) साहाय्याने बनविलेला असतो. सर्वसाधारण मॉनिटर स्क्रीनचा आकार ८ इंच ते सतरा इंचात उपलब्ध असतो. अलीकडे एलसीडी (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले) किंवा टीएफटी (थिन फिल्म ट्रान्सीटर) मॉनिटरचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. सीटीआर चे तंत्रज्ञान न वापरता एलसीडी (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले) चा वापर केलेला असतो. 
 LCD मॉनिटर   

CRT मॉनिटर


प्रिंटर
प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकातील तयार उत्तर हे कागदावर मुद्रित करण्याकरिता या साधनाचा वापर करतात. प्रिंटर द्वारे होत असलेला मजकूर हा कायमस्वरूपी असतो. त्यामध्ये बदल करता येत नाही. यामुळेच त्याला हार्ड कॉपी असे म्हणतात.

प्रिंटरचे विविध प्रकार आहेत
  • इंकजेट प्रिंटर
  • डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
  • लेजर प्रिंटर इत्यादी.

इंकजेट प्रिंटर 

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर

लेजर प्रिंटर