on Sunday, July 14, 2013


संगणकाच्या विकासातील दुसरी जनरेशन (१९५६–१९६३)
  • दुसऱ्या टप्प्यातील संगणकामधील ट्रांझिस्टर या घटकामुळे हे संगणक पूर्वीच्या संगणकापेक्षा अधिक छोटे, वेगवान, अधिक कार्यक्षम आणि अधिक विश्वासार्ह बनले.
IBM 7030Stretch
  • सुरुवातीचे सुपरकॉम्प्युटर्स म्हणजे IBM (आयबीएम) चे Stretch (स्ट्रेच), व स्पेरी- रड यांचे LARC (लार्क). हे पहिले मोठ्या प्रमाणावर निर्माण केले गेलेले संगणक! यातील साठविलेला प्रोग्राम आणि प्रोग्रामिंगच्या भाषेमुळे संगणकाच्या किंमती कमी होण्याच्या दृष्टीने तसेच उद्योगधंद्यासाठी उयुक्तता वाढण्याच्या दृष्टीने संगणकामध्ये अनुकूलता आली.
  • व्हक्युम टयूबपेक्षा ट्रांझिस्टर्सचा वापर ही जरी सुधारणा असली तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याने संगणकाच्या आतील नाजूक भागांचे नुकसान होताच होते. 
  • याच काळात अधिक चांगल्या हाय लेव्हल लँग्वेजेस्, (उच्चस्तरीय भाषा) उदाहरणार्थ, COBOL (कोबोल, कॉमन बिझनेस ओरिएन्टेड लँग्वेजे) आणि FORTRAN (फोरट्रान, फॉर्म्युला ट्रान्सलेटर) उदयास आल्या. आजपर्यंत त्यांचा उपयोग केला जात आहे.
  • नवीन प्रकारची कार्यक्षेत्रे (प्रोग्राम तयार करणारे अनालिस्टम्हणजे विश्लेषक आणि संगणक व्यवस्थेतील तज्ञ) त्याचबरोबर संपूर्ण सोफ्टवेअरचा उद्योग या दुसऱ्या टप्प्यांमध्ये सुरु झाला.