on Sunday, July 14, 2013
संगणकाच्या विकसनातील तिसरी जनरेशन (१९६४-१९७१)

IC-Integrated Circuit
Jack Kilby.jpg
 जॅक किल्बी 
  • १९५८ मध्ये जॅक किल्बी याने आयसी-इंटिग्रेटेड सर्किट ( IC-Integrated Circuit) तयार केले.
  • IC मध्ये क्वार्टझपासून बनविलेल्या छोट्या सिलिकॉन चिप (चकती) वर तीन इलेक्ट्रॉनिक घटक एकत्रितरित्या बसवलेले असतात.
  • त्यानंतर याहूनही अधिक घटक एकाच चिप (चकती) वर बसविण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. या चिपला सेमीकंडक्टर असे म्हणतात. एकाच चिपवर अनेक घटक बसवता आल्यामुळे संगणकाचा आकार लहान करणे शक्य झाले.
  • संगणक विकसनाच्या तिसऱ्या टप्प्यातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिमचा (संगणकाची कार्यपद्धती) उपयोग याच काळात सुरु झाला. संगणकाच्या मेमरीचे नियंत्रण व नियोजन करणाऱ्या मुख्य प्रोग्रॅमबरोबरच इतर अनेक प्रोग्रॅम्स रन करणे या ऑपरेटिंग सिस्टीममुळे शक्य झाले.