on Friday, July 12, 2013
पृथ्वीवरील एकपेशीय सजीव ते मानव यांच्या उत्क्रांतीलाही कोट्यावधी वर्ष लागली. मानव ही 'एप' वानरापासून उत्क्रांत होत होत ताठ कण्याचा व आजचा बुद्धिमान माणूस निर्माण झाला.टेलिफोन ते वायरलेस मोबाईल या संपर्क माध्यमातही बरीच स्थित्यंतरे होत आली. यामुळेच आज आपण विश्वात कुठूनही कोठेही संपर्क एकमेकांना काही सेकंदाच्या अवधीत करू शकतो.संगणक हा ही संपर्काकरिता प्रभावी माध्यम ठरलेले आहे. पण या संगणकाची उत्क्रांतीही काही संकल्पनेवर आधारित टप्प्याटप्प्याने होत गेली.
गोट्या / शिंपलेपूर्वीच्या काळात गणना किंवा मोजणी करण्याकरिता मानव वस्तूच्या संचाची तुलना ही दुसऱ्या संचाशी करून मोजमाप करी  याकरिता मुख्यत: गोट्या, दगड, व शिंपले इत्यादीचा वापर मुबलक प्रमाणात होत असे. 
Abacus
अबाकस
  • अबाकसचा सुमारे २००० वर्षापुर्वी जेव्हा अबाकसचा जन्म झाला तेव्हा तेव्हाच खऱ्या अर्थाने संगणकाच्या इतिहासाची सुरुवात झाली असे म्हणता येईल. अबाकसचा म्हणजे मणी असलेल्या दोन आडव्या तारा लावलेली एक लाकडी मांडणी. अबकासचा उपयोग हा मुबलक प्रमाणात बेरीज व वजाबाकी सारख्या गणिती प्रक्रियेकरिता होत असे.
Napier Bone
नेपिअर्स बोन्स
     
  • नेपिअर्स बोन्स गणितज्ञ नेपिअर्स बोन्स याने लॉगरिदमचा शोध लावला. १६१२ मध्ये त्याने हस्तिदंती पट्ट्या वापरून गुणाकार, भागाकार, वर्गमूळ इत्यादीसाठी एक पद्धत शोधून काढली ही नेपिअर्स बोन्स या नावाने ओळखली जाऊ लागली. 
Pascaline calculating machine
Pascaline calculating machine
          
  • पास्कल (पास्कल लाईन) १६४२ मध्ये ब्लेस याने बेरजेसाठी एक यांत्रिक उपकरण तयार केले. ज्या संख्यांची बेरीज करायची त्या संख्या डायल केल्या की एकमेकात अडकलेले दाते आणि असलेला चक्रांचा संच योग्य आकडे फिरवायचा आणि विन्डोमध्ये उत्तर दिसायचे. ८ अंकी संख्येपर्यंत गणना करणारे हे यंत्र होते
 Charles Babbage Difference Engine
डीफरन्शियल मशिन 


  • डीफरन्शियल मशिन चार्लस बँबेज हा आधुनिक संगणकाचा जनक म्हणून ओळखला जातो. या ब्रिटिश तज्ञ संशोधकाने १८२० मध्ये एका तत्त्वानुसार यांत्रिक गणन उपकरणे तयार केली. त्यांच्यात आधुनिक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरच्या रचनेचा पाया घातला गेला होता. १८२२ मध्ये बँबेजने तयार केलेली सविस्तर रेखाटने व त्यांच्या बारकाव्यांचा अभ्यास करून ब्रिटिश शास्त्रज्ञांनी ३१ अंकी संख्येपर्यंत बिनचूक गणना करणारे डीफरन्स मशिन तयार केले. ह्या तयार केलेल्या मशीनच्या कामात काहीही दोष नव्हता.