on Friday, July 12, 2013
संगणकाच्या विकसनाची पहिली जनरेशन (१९४५ – १९५६)

  • ज्या विशिष्ट कामासाठी संगणक वापरायचा असेल, फक्त तेच काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीसंबंधी सूचना तयार केल्या जात.
  • प्रत्येक संगणकामध्ये त्या संगणकाने कसे काम करायचे हे सांगणारा मशीन लँग्वेज (यांत्राभाषा) नावाचा बायनरी कोडेड (द्विमान संकेत) प्रोग्राम असायचा. यामुळे संगणकाचे प्रोग्रामिंग (आज्ञाप्रणाली) करणे अवघड बनत असे आणि त्याचे बहुपयोगीत्व आणि वेग या दोन्हीही गोष्टींवर मर्यादा येत असे.
  • संगणकात व्हक्यूम ट्यूब्ज (निर्वात नलिका) चा वापर असे. ज्यांच्यामुळे संगणकाचा आकार अवाढव्य होत असे.
  • डेटा स्टोरज (माहिती साठविण्यासाठी) मग्नेटिक ड्रम्सचा वापर होत असे.
 Z३  संगणक
  

  • १९४१ मध्ये, जर्मन इंजिनिअर कोनराद झुज याने विमाने आणि क्षेपणास्त्रे यांचा आराखडा तयार करण्यासाठी Z३ हा संगणक बनविला.
  • १९४३ मध्ये ब्रिटिशांनी जर्मन सैन्याच्या संकेतिक भाषेतील संदेश तोडण्यासाठी कोलोसस नावाचा संगणक गुप्तपणे तयार केला. (हा सर्वसामान्य कामांसाठी नव्हता)
File:Two women operating ENIAC.gif
इलेक्ट्रॉनिक न्युमरिकल इंटिग्रेटर आणि कॉम्प्युटर (ENIAC)
      

  • १९४३ मधील जॉन प्रेस्पर एकर्ट (१९१९ – १९९५) आणि जॉन डब्लू मॉली (१९०७ – १९८०) यांनी विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक न्युमरिकल इंटिग्रेटर आणि कॉम्प्युटर (ENIAC) मध्ये, १८,००० व्हक्युम ट्यूब्ज, ७०,००० रेझिस्टर्स आणि ५ दशलक्ष सोल्डर केलेले जोड बिंदू होते. हा संगणक म्हणजे यांत्रिक उपकरणाचा एवढा मोठा भाग होता की त्याला १६० किलोवॅटस् एवढी वीज लागत असे. तो सर्वसामान्य कामांसाठी खूप वेगाने गणना करणारा संगणक होता.

EDVAC
इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर (EDVAC)
     
  • १९४५ मधील वॉन न्यूमन याने तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर (EDVAC) मध्ये, साठविलेले प्रोग्रॅम व डेटा या दोन्ही सामावण्यासाठी मेमरी (स्मृती विभाग) होता.सर्वात महत्त्वाचे होते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट! म्हणजे एकाच स्त्रोतामधून सर्व संगणकीय क्रियांचे नियमन करणारे मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र होय.
     
  • १९५१ मध्ये यूनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर UNIVACI हा संगणक रेमिंग्टन रड यांनी बनविला. हा संगणकाच्या विकासातील प्रगतीचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने उपयोगी असा व्यापारी तत्त्वावर उपलब्ध झालेल्या पहिल्या संगणकापैकी एक होता.