on Sunday, July 14, 2013
संगणकाच्या विकसनातील चौथी जनरेशन (१९७१ पासून आजपर्यंत)


  • इंटिग्रेटेड सर्किटस्नंतर विकासाची पुढची एकाच दिशा शक्य होती. ती म्हणजे चीपचा आकार! म्हणजेच लार्ज स्केल इंटिग्रेशन (LSI) अर्थात एकाच चिपवर शेकडो घटक बसविणे.
  • १९८० च्या दशकात व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (VLSI) मुळे लक्षावधी घटक एकाच चिपवर बसविणे शक्य झाले.
  • अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन (ULSI) मुळे हीच संख्या काही दशलक्षांपर्यंत वाढली.
  • १९७१ मध्ये विकसित केल्या गेलेल्या Intel 4004 (इंटेल ४००४) मुळे इंटिग्रेटेड सर्किटसने आणखी एक पुढचा मोठा टप्पा गाठला. तो म्हणणे संगणकाचे सर्व घटक (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी आणि इनपुट-आउटपुट नियंत्रक) अत्यंत छोट्या सेमिकंडक्टर चिपवर बसवले होते. 
  • पूर्वी प्रत्येक कामाच्या गरजेनुसार इंटिग्रेटेड सर्किटचे वेगवेगळे उत्पादन करावे लागे. आता मात्र एकाच प्रकारच्या मायक्रोप्रोसेसरचे उत्पादन करून त्याच्यापासून कितीही वेगवेगळया उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रोग्रॅम करणे शक्य झाले आहे.
  • लवकरच मायक्रोवेव्ह ओव्हन्स, दूरचित्रवाणी संच, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टिम असलेली वाहने यांसारख्या वस्तूंमध्ये मायक्रोप्रोसेसर्सचा वापर सुरु झाला. 
IBM Personal Computer
  • १९८१ मध्ये IBM ने त्यांचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर (सुटसुटीत छोटा संगणक) घर, ऑफिस आणि शाळांमध्ये वापरण्यासाठी बाजारात आणला. 
  • लॅन LAN (लोकल एरिया नेटवर्क) सारखे थेट वायरिंग अथवा दूरध्वनीच्या तारांच्या माध्यमातील ही नेटवर्क्स (जाळी) प्रचंड प्रमाणात पसरू लागली. संगणकाच्या जागतिक महाजालाच्या, उदाहरणार्थ इंटरनेटच्या माध्यमातून माहितीच्या एकाच जाळयात जगभरातील संगणक जोडले गेले.